आडगाव, केलवड गावातील रुग्णांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:31+5:302021-07-05T04:14:31+5:30
कोरोना संक्रमित असलेल्या गोरगरीब रुग्णांना प्राथमिक उपचार देण्यात येत आहे. तालुक्यातील आडगाव व केलवड गावात नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव ...

आडगाव, केलवड गावातील रुग्णांना दिलासा
कोरोना संक्रमित असलेल्या गोरगरीब रुग्णांना प्राथमिक उपचार देण्यात येत आहे. तालुक्यातील आडगाव व केलवड गावात नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव प्रा. लक्ष्मण गोर्डे यांनी दोन दवाखाने उभारले असून, या गावातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपूर्वी हे दवाखाने उभारले असून, कोरोना आपत्तीत रुग्णांना उपयुक्त ठरते आहे. या दवाखान्यात थंडी, ताप खोकला, सर्दी अशा कोरोनाच्या प्राथमिक लक्षणांवर उपाय केले जातात. त्यामुळे गावांतील गोरगरीब रुग्ण प्रथमतः फाऊंडेशन अंतर्गत चालत असलेल्या दवाखान्यात उपचार घेतात. या दवाखान्यात आठशे ते हजार रुग्णांनी उपचार घेतले आहे व प्रत्येक रुग्णांना व्यवस्थित उपचार दिले जातात अशी माहिती डॉ. सोपान होन यांनी दिली .
..............
मी खेडेगावातील रहिवासी असून, कायम सामाजिक काम करीत आहे. त्यामुळे कोरोना काळात रुग्णांना बाहेरील मोठ्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात; परंतु या फाऊंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या दवाखान्यात रुग्णांची अल्पदरात सेवा केली जात आहे.
-प्रा. लक्ष्मण गोर्डे, सचिव, नरेश राऊत फाऊंडेशन, केलवड
...............
फोटो - ०४ केलवड
राहाता तालुक्यातील आडगाव येथे नरेश राऊत फाऊंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या दवाखान्यात उपचार घेत असताना.