पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचा सवतासुभा

By Admin | Updated: December 17, 2015 23:42 IST2015-12-17T23:34:12+5:302015-12-17T23:42:49+5:30

अहमदनगर: अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस स्वबळावर लढणार असून तसा आदेश प्रदेश कॉँग्रेसने दिला असल्याची माहिती सत्यजित तांबे व दीप चव्हाण यांनी येथे दिली.

Congress's patriotism in by-election | पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचा सवतासुभा

पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचा सवतासुभा

अहमदनगर: अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस स्वबळावर लढणार असून तसा आदेश प्रदेश कॉँग्रेसने दिला असल्याची माहिती सत्यजित तांबे व दीप चव्हाण यांनी येथे दिली. कॉँग्रेसच्या या सवतासुभामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे. युतीतही ताणाताणी सुरू आहे.
अजिंक्य बोरकर व अनिता भोसले हे दोन नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे १० जानेवारीला प्रभागाची पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २२ डिसेंबर आहे. या दोन्ही प्रभागाची पोटनिवडणूक स्वतंत्र लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी रेटा लावला होता. शिवाय निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पक्षाने या दोन्ही जागा पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश कॉँग्रेसनेही तसे आदेश दिले असल्याचे तांबे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत आघाडी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र तांबे यांनी पक्षाची भूमिका जाहीर करून दोन्ही जागा कॉँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. जून २०१६ मध्ये महापौर पदाची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने या दोन प्रभागातील पोटनिवडणुकीला महत्त्व आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवारी अंतिम केली जाईल. कॉँग्रेसला पोषक असे वातावरण असून त्याचा फायदा या पोटनिवडणुकीत होणार असल्याचे तांबे, चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गर्जे, चव्हाण यांनी घेतले अर्ज कॉँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर होताच दीप चव्हाण यांचा मुलगा जयेश याने प्रभाग १५ साठी प्रशांत गर्जे यांनी प्रभाग ११ मधील उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे. या दोघांना कॉँग्रेसची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. प्रभाग ११ साठी रमेश आजबे, प्रशांत गर्जे आणि १५ साठी जयेश दीप चव्हाण, विणा विजय वडांगळे, मंगल बाबुराव बोर्डे, भारती भोसले व किरण उनवणे यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले.

Web Title: Congress's patriotism in by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.