शिर्डीत काँग्रेसमध्ये बंडाळी

By Admin | Updated: July 15, 2014 00:47 IST2014-07-14T23:06:45+5:302014-07-15T00:47:29+5:30

शिर्डी : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर विखे समर्थक व काँग्रेसच्या गटनेत्या असलेल्या अनिता विजय जगताप यांनी काँग्रेसलाच धोबीपछाड देत

Congress rebellion in Shirdi | शिर्डीत काँग्रेसमध्ये बंडाळी

शिर्डीत काँग्रेसमध्ये बंडाळी

शिर्डी : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर विखे समर्थक व काँग्रेसच्या गटनेत्या असलेल्या अनिता विजय जगताप यांनी काँग्रेसलाच धोबीपछाड देत भाजपा, सेना व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला़ त्यानंतर काँग्रेसने अध्यक्षपदासाठी सविता ताराचंद कोते व प्रयागाबाई ज्ञानेश्वर गोंदकर यांचे अर्ज दाखल केले़
सत्तांतराच्या दृष्टीने महाआघाडीने जोरदार खेळी खेळली असली तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, तर माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी नगरपंचायतीवर विखें यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा झेंडा कायम राहिल असा दावा केला आहे़ दरम्यान पडद्यामागील राजकीय घडामोडींना वेग आला असून काही नगरसेवक अज्ञातवासात असल्याची चर्चा आहे़ यामुळे येत्या १८ जुलै रोजीच चित्र स्पष्ट होणार आहे़ सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भाजपा, सेना व राष्ट्रवादीने मोठे शक्तीप्रदर्शन करत अनिता जगताप, तसेच भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले़ यावेळी आमदार अनिल राठोड, नगर शहप्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेंवरे, तालुकाप्रमुख कमलाकर कोते, अभय शेळके, भाजपाचे तालुका प्रमुख नितीन कापसे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते़ त्यानंतर दीडच्या सुमारास काँग्रेसकडून सविता कोते व प्रयागाबाई गोंदकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले़ यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, उत्तम कोते, गोपीनाथ गोंदकर, सुमित्रा कैलास कोते, जयश्री विष्णू थोरात, वैशाली वेणुनाथ गोंदकर, तसेच ताराचंद कोते आदींची उपस्थिती होती़
विधानसभेच्या तोंडावर विखे गटासाठी हा मोठा हादरा समजला जात आहे़ दरम्यान गटनेत्यानेच बंडखोरी केल्याने काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला असून नव्या गटनेत्याच्या निवडीसाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Congress rebellion in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.