इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे शिर्डीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:55+5:302021-06-09T04:26:55+5:30
इंधन दरवाढ रोज नवेनवे उच्चांक करत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने जीवनावश्यक ...

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे शिर्डीत आंदोलन
इंधन दरवाढ रोज नवेनवे उच्चांक करत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचीही मोठी दरवाढ झाली आहे. या दरवाढीच्या विरोधात सर्वसामान्यांच्या मनातील खदखद राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर पडली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीत इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लावलेल्या फलकासमोर केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज लोंढे, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी, लता डांगे, एल. एम. डांगे, बाळासाहेब खर्डे, रमेश गागरे, तालुका उपाध्यक्ष सुभाष निर्मळ, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, युवक शहराध्यक्ष अमृत गायके, माजी नगरसेवक सुरेश आरने, राजेंद्र निर्मळ, संजय पगारे, अनुज गंगवाल, मुन्ना फिटर, आसिफ इनामदार, अनिस शेख, असीम बेग, राहात्याचे युवक अध्यक्ष सचिन गाडेकर, बबन नळे, प्रवीण घोडेकर, अरबाज काद्री, संतोष वाघमारे, कृष्णा गायकवाड, मदन मोकाटे, दत्ता त्रिभुवन, मंगेश खाकाळे, गणेश मोगल, गणेश चोळके, संजय जेजुरकर, मोसिन सय्यद, रवी जायभाये, मोसिन शेख, स्वराज त्रिभुवन यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------------------