पेट्रोल- डिझेल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 13:11 IST2020-06-29T13:11:14+5:302020-06-29T13:11:43+5:30
अहमदनगर- सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार लहू कानडे यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

पेट्रोल- डिझेल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध
अहमदनगर- सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार लहू कानडे यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, उबेद शेख, किरण काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, जगामध्ये कुणाच्या महामारीने त्रस्त झालेले आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदे अजुनी पूर्वपदावर आले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे. सात जून दोन हजार वीस पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. शनिवारपर्यंतची ही दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 9.12 रुपये तर डिझेलमध्ये 11.1 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे.
देशभरात पेट्रोलच्या किमती प्रतिलिटर 87- 88रुपयाचे पुढे गेल्या आहेत तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोल पेक्षा जास्त महाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना त्यांचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा विचार करून देशाच्या अंतर्गत इंधनाचे दर ठरवले जात आहेत. सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही. 2014 मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे 9.40 रुपये तर डिझेलवर 3. 56 रुपये होते. सध्या हे शुल्क पेट्रोल 32. 98 रुपये तर डिझेल 31. 83 रुपये असे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे. ते सर्व सामान्य जनता दुहेरी संकटात असताना आपण या प्रश्नी जातीने लक्ष घालून पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.