नगरमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीची घौडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 17:52 IST2017-02-23T17:52:56+5:302017-02-23T17:52:56+5:30
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचीआतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गटातील एकूण ७२ जागांपैकी ३४ जागांचे निकाल स्पष्ट झाले असून

नगरमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीची घौडदौड
अहमदनगर: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचीआतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गटातील एकूण ७२ जागांपैकी ३४ जागांचे निकाल स्पष्ट झाले असून, काँग्रेस राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे़ काँग्रेस-१२, राष्ट्रवादी-११ भाजप-७, सेना-३, भारतीय कम्युनिस्ट-१ आणि इतर-१ असे सध्याचे बलाबल आहे़
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या शेवगाव तालुक्यातील चारही गट व गणांत राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत़ सेनेचे वर्चस्व असलेल्या नगर तालुक्यात चारपैकी ३ गटांत काँगे्रस महाघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे़ राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली आहे़ भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना त्यांच्याच नगर तालुक्यात खाते उघडता आले नाही़ काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत़ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे विजयी झाल्या आहेत़ राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्या स्नुषा सुवर्णा सचिन जगताप विजयी झाल्या आहेत़