शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्जतमध्ये काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 15:59 IST

उडीद, मका, ऊस यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नावर काँग्रेसने सुरु केलेले आमरण उपोषण तहसीलदरांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंगळवारी हे आमरण उपोषण सोडण्यात आले.

कर्जत : उडीद, मका, ऊस यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नावर काँग्रेसने सुरु केलेले आमरण उपोषण तहसीलदरांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंगळवारी हे आमरण उपोषण सोडण्यात आले.शेतक-यांकडून प्रति एकर दोन ऐवजी पाच क्विंटल या प्रमाणे उडीद खरेदी करावी. उडीद खरेदी केंद्रावर हमाली व मशीनच्या नावाखाली शेतक-यांकडून प्रति क्विंटलला १०० रुपये घेतले जात आहेत हा प्रकार बंद करावा. या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. उडीद व मका हमीभावाने विनाअट खरेदी करावी. उसाला ३४०० रुपये भाव मिळावा, आदी विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण उपोषण सुरू केले. या उपोषणाला कर्जत तालुका काँग्रेसने पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे बाळासाहेब साळुंके, तालुकाध्यक्ष किरण पाटील, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे, संजय तोरडमल, मिलिंद बागल, सतीश पाटील, कुळधरणचे सरपंच अशोक जगताप, उपसरपंच भाऊसाहेब सुपेकर या आंदोलकांशी निवासी नायब तहसीलदार सीताराम आल्हाट यांनी मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली. हे प्रश्न सरकारला कळवू आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी लेखी हमी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीcongressकाँग्रेसGovernmentसरकारKarjatकर्जत