काँग्रेसचे महापालिकेत आंदोलन; शहर जिल्हाध्यक्षांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:18+5:302021-07-07T04:27:18+5:30
किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण ...

काँग्रेसचे महापालिकेत आंदोलन; शहर जिल्हाध्यक्षांवर गुन्हा
किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, नाथा अल्हाट, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, सुजीत जगताप, सचिव प्रशांत वाघ, सागर काळे, माजी नगरसेविका जरीना पठाण, शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, शारदा वाघमारे, उषा भगत, कल्पना खंडागळे, डॉ. मनोज लोंढे, ऋतिक लद्दे, लखन छजलानी, रावसाहेब काळे, दीपक चांदणे, साईनाथ बोराटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी महापालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
---------------------
दालनात जाण्यावरून वाद
आंदोलकांचे महापालिकेचे उपायुक्त यशवंता डांगे यांनी निवेदन स्वीकारले. उपायुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र आयुक्त स्वतः बाहेर न आल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. यावेळी काळे यांच्यासह काही आंदोलकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जाण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तास तैनात असलेले उपनिरीक्षक सोळंके यांनी पाच महिलांनी दालनात जावे, मात्र जवळील साहित्य बाहेर ठेवा, असे सांगितले तेव्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना आयुक्तांच्या दालनापासून दूर नेले. काळे यांच्यासह काही आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालत, अपमानास्पद बोलून आयुक्तांच्या दालनात बळजबरीने जाण्याचा प्रयत्न केल्याचे याप्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीत नमूद आहे.
-----------------------------
फोटो ०६ आंदोलन
ओळी : नगर शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती तसेच रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, या मागण्यांसाठी मंगळवारी काँग्रेसच्यावतीने महापालिकेवर आसूड मोर्चा काढला होता.