संगमनेरात टपरीधारकांचा पालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 23:51 IST2016-03-22T23:46:00+5:302016-03-22T23:51:54+5:30

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले.

In the confluence of stakeholders | संगमनेरात टपरीधारकांचा पालिकेत ठिय्या

संगमनेरात टपरीधारकांचा पालिकेत ठिय्या

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. आंदोलक व मुख्याधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत शहरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग, नवीन नगररोड, दिल्ली नाका, जोर्वे नाका, बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविली. या कारवाईमुळे नवीननगर रोडवरील अतिक्रमणधारक रस्त्यावर आले. हातगाडी व टपऱ्यांमधील छोट्या व्यावसायिकांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या टपरीधारकांनी मंगळवारी दुपारी बारा वाजता नगरपरिषदेत जाऊन मासिक सभा सुरू असताना रामकृष्णदास महाराज सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगरसेवक कैलास वाकचौरे, जावेद जहागीरदार, किशोर पवार, ज्ञानेश्वर कर्पे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, नितीन अभंग, सोमेश्वर दिवटे व मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांनी बाहेर येऊन चर्चा केली. आंदोलकांनी पालिका पदाधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर पडण्यास मज्जाव करीत जोरदार घोषणा दिल्या. सर्वांनी प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसकन मांडून ठिय्या दिला. सचिन साळुंके व दीपक साळुंके यांनी आंदोलकांची भूमिका मांडली.
पालिकेने नवीन नगररोडवरील भास्करराव दुर्वे शॉपींग सेंटरमधील गाळेधारकांचे नूतनीकरण गेल्या ९ वर्षांपासून केले नसल्याचा आरोप केला. अशा बेकायदा ३४ गाळेधारकांवर कारवाई करून ते भाडेतत्वावर आम्हाला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी कुरे व साळुंके यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तांबे यांनी समजूत घालत मागण्यांसंदर्भात ठराव करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलक पायऱ्यांवर ठाण मांडून होते. आंदोलनात कासीम शेख, विशाल पोकळे, अजहर शेख, पप्पू तांबोळी, कैलास फटांगरे, प्रमोद गणोरे, शंकर भारती, फईम बागवान, नाजीम बागवान, कैलास दसरे, विजय दसरे, बाबुराव गवांदे, अनिल महाराज, सोमनाथ वडेवाले, गौरव मिसाळ, नंदू भोईर आदी सहकुटुंब सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
नगरपरिषद मालकीचे गाळे भाडेतत्वावर देण्याकरिता आधी ठराव होतो, मग निविदा काढून लिलाव घेतले जातात. याला काही काळ जावू द्यावा लागेल. एकाएकी कुठलाही निर्णय होत नसतो.
-डॉ. श्रीनिवास कुरे, मुख्याधिकारी

Web Title: In the confluence of stakeholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.