संगमनेरातील नुकसानीचे पंचनामे सुरू
By Admin | Updated: August 26, 2014 23:21 IST2014-08-26T23:11:49+5:302014-08-26T23:21:50+5:30
संगमनेर: संगमनेरला झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला भेट देवून पाहणी केली.

संगमनेरातील नुकसानीचे पंचनामे सुरू
संगमनेर: संगमनेरला झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला भेट देवून पाहणी केली. प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देत त्यांनी नागरिकांना धीर दिला.
यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, नगरसेवक दिलीप पुंड, नितीन अभंग, गोरख कुटे, गणेश मादास, सोमेश्वर दिवटे, शकील शेख, विश्वास मुर्तडक, रिजवान शेख, अनिस शेख तसेच प्रांताधिकारी संदीप निचित, तहसीलदार शरद घोरपडे, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे आदी उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून संगमनेरांना मदतीची अपेक्षा आहे. अचानक झालेल्या या धुवाँधार पावसाने नागरिक हतबल झाले आहेत. गेल्या ५० वर्षात प्रथमत: इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस अनुभवल्याची चर्चा होती. (प्रतिनिधी)
मंत्र्यांचे मदत कार्य
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने जेसीबी, बुलडोझर, ट्रॅक्टर, पाणी उपसा मशिन व मनुष्यबळ देत नुकसानग्रस्त भागात मदतकार्य करून पालकत्वाची भूमिका निभावली. संगमनेर-अकोले रस्त्यावरील बर्फ कारखाना परिसरात ओढ्याला कमरे इतके पाणी आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. या पाण्यात दोन दुचाकी वाहून गेल्या. तर मारूती कार पाण्यावर तरंगल्याने वाहन चालकांची चांगलीच घबराट झाली.
नाटकी नाल्यात माती व कचऱ्याची भर पडल्याने अरूंद झाला आहे. त्यातच पावसाळा सुरू होण्यापुर्वी नगरपरिषदेकडून नाल्याची साफसफाई केली गेली नाही. त्याचे परिणाम गोरगरीब जनतेला भोगावे लागले. आधीच नाला साफ झाला असता तर ही परिस्थिती ओढवली नसती.