तनपुरे कारखान्याला जप्ती नोटीस
By Admin | Updated: November 3, 2016 01:02 IST2016-11-03T00:40:17+5:302016-11-03T01:02:17+5:30
राहुरी : आर्थिक अडचणीत सापडलेल्या तनपुरे कारखान्याला महसूल विभागाने जप्तीची नोटीस बजावली आहे़ ऊसउत्पादकांचे साडेअकरा कोटी रुपयांचे पेमेंटसंदर्भात

तनपुरे कारखान्याला जप्ती नोटीस
राहुरी : आर्थिक अडचणीत सापडलेल्या तनपुरे कारखान्याला महसूल विभागाने जप्तीची नोटीस बजावली आहे़ ऊसउत्पादकांचे साडेअकरा कोटी रुपयांचे पेमेंटसंदर्भात तीन वेळेस नोटीस बजाविण्यात येणार असून, रक्कम न भरल्यास जमीनजप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अनिल दौंडे यांनी दिली़
राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे कारखान्याने सन २०१४ मधील उसाचे एफआरपीप्रमाणे पेमेंंट न दिल्याने महसूल विभागाने नोटीस बजावली आहे़ तनपुरे कारखाना आर्थिक अडचणीत आल्याने बंद पडला़ संचालक मंडळाने उसाचे पेमेंट दिले नाही़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याच्या जमिनीवर बोजा चढविण्याचा आदेश दिला होता़ त्यानंतर महसूल विभागाने कारखान्याच्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाचे नाव लावले होते़ अडीच वर्षांपासून श्ोतकऱ्यांची रक्कम मिळालेली नाही़ यासंदर्भात महसूल विभागाचा पाठपुरावा सुरू आहे़ उसाचे पेमेंट कधी मिळणार, याबाबत श्ोतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे़
(तालुका प्रतिनिधी)