खरेदी-विक्री संघावर जप्ती

By Admin | Updated: October 22, 2015 21:18 IST2015-10-22T21:18:19+5:302015-10-22T21:18:19+5:30

लाखो रूपयांची देवाणघेवाण करणार्‍या सावकारांवर तसेच कोट्यवधी रूपयांची उलाढाल करणार्‍या सहकारी पतसंस्थांवर नियंत्रण ठेवणारे सावकारांचे सहायक निबंधक

Confiscation of the Buy-out Team | खरेदी-विक्री संघावर जप्ती

खरेदी-विक्री संघावर जप्ती

 श्रीरामपूर :लाखो रूपयांची देवाणघेवाण करणार्‍या सावकारांवर तसेच कोट्यवधी रूपयांची उलाढाल करणार्‍या सहकारी पतसंस्थांवर नियंत्रण ठेवणारे सावकारांचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याच कार्यालयावर तालुका खरेदी विक्री संघावरील कर्जफेडीसाठी जप्ती आली आहे.
श्रीरामपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ गेल्या अनेक वर्षांपासून अवसायानात निघालेला आहे. या संघाचे अवसायक म्हणून सहायक निबंधक काम पाहत आहेत. संघाच्या श्रीरामपूर नगरपालिकेजवळील जुन्या इमारतीमध्येच सहायक निबंधकांचे कार्यालय आहे. संघाचे कामकाज सुरळीत असताना संघाने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीरामपूर शाखेकडून काही लाख रूपयांचे कर्ज घेण्यात आले होते. संघ डबघाईत गेल्यानंतर जिल्हा बँकेचे कर्ज फेडण्यात संघाला अपयश आले. त्यामुळे जिल्हा बँकेने सहायक निबंधक कार्यालय ज्या खरेदी विक्री संघाच्या इमारतीत आहे, त्या इमारतीचा काही भाग वर्षांपूर्वी जप्त केला.
इमारतीचा काही भाग जप्त करून बँकेने कर्जाची मूळ मुद्दलाची रक्कम वसूल केली. पण कर्जावरील व्याज वसुलीसाठी बँकेने श्रीरामपूरच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून संघाच्या इमारतीत असलेल्या सहायक निबंधक कार्यालयाच्या भागावरही जप्ती आणण्याचा प्रयत्न केला. 
त्याविरोधात सहायक निबंधकांनी न्यायालयातून स्थगिती मिळविण्याचाही यापूर्वी प्रयत्न केला. कोर्टबाजी सुरू असतानाच शिवाजीरोडच्या प्राईम लोकेशनवर असलेल्या या इमारतीवर बिल्डर लॉबीचा डोळा असल्याने त्यांनी ही इमारत ऐनकेन प्रकारे ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालविला होता. 
दरम्यान श्रीरामपूरचे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश अविनाश नांदगावकर यांनी स्पेशल दरखास्त क्रमांक २0/२0१५ च्या सुनावणीदरम्यान थकबाकीदार श्रीरामपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघास आपल्या मालमत्तेची विक्री करून, बक्षीस देऊन किंवा इतरप्रकारे हस्तांतर करण्यास तसेच तिच्यावर बोजा चढविण्यास मनाई करणारा हुकूम दिला आहे.
कर्ज पुरवठा करणार्‍या जिल्हा बँकेस थकबाकीदार असलेल्या खरेदी विक्री संघाची श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील नगर भूमापन क्रमांक ९२२ पैकी मोकळा प्लॉट ३0४.0९ चौरस मीटरची जागा जप्त करुन दिली आहे. 
(प्रतिनिधी) ■ श्रीरामपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने पूर्वी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी बँकेकडे संघाची इमारत गहाण ठेवण्यात आली होती. कर्जाच्या मुद्दल रकमेपोटी संघाच्या इमारतीचा काही भाग बँकेने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे आम्ही बँकेची कर्ज मुद्दलाची रक्कम फेडली आहे. व्याज वसुलीसाठी संघाच्या इमारतीच्या काही भागावर आता जप्ती आली आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-सुखदेव सूर्यवंशी, अवसायक श्रीरामपूर खरेदी विक्री संघ, तथा सहायक निबंधक, श्रीरामपूर.

Web Title: Confiscation of the Buy-out Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.