संगमनेरमध्ये जमिनीतून कंप
By Admin | Updated: October 21, 2016 00:37 IST2016-10-21T00:12:17+5:302016-10-21T00:37:20+5:30
संगमनेर तालुक्यातील बोटा, माळवाडी, आंबी दुमाला या परिसरात आज रात्री जमिनीत कंप जाणवला. कुरकुटवाडी येथे जमिनीतून आवाजही आला.

संगमनेरमध्ये जमिनीतून कंप
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 21- संगमनेर तालुक्यातील बोटा, माळवाडी, आंबी दुमाला या परिसरात आज रात्री जमिनीत कंप जाणवला. कुरकुटवाडी येथे जमिनीतून आवाजही आला.
माळवाडी या गावात बुधवारी रात्रीही कंप जाणवला होता, असे पोलीस पाटील जठार यांनी सांगितले. हे भूकंपाचे धक्के असावेत, असा स्थानिक नागरिकांचा संशय आहे. काही वर्षांपूर्वीही या भागात असाच कंप झाला होता.