नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची रचना
By Admin | Updated: August 17, 2015 00:01 IST2015-08-16T23:56:08+5:302015-08-17T00:01:55+5:30
पारनेर : प्रथमच स्थापन झालेल्या पारनेर नगरपंचायतीत सतरा प्रभाग होणार असून त्याची प्रभागरचना प्रशासक गणेश शिंदे यांनी जाहीर केली आहे.

नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची रचना
पारनेर : प्रथमच स्थापन झालेल्या पारनेर नगरपंचायतीत सतरा प्रभाग होणार असून त्याची प्रभागरचना प्रशासक गणेश शिंदे यांनी जाहीर केली आहे. यामध्ये प्रभाग नऊ अनुसुचीत जातीसाठी राखीव होणार असून इतर जागांसाठी वीस आॅगस्टला आरक्षण सोडत निघणार आहे.
ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायतीची स्थापना झाल्यावर किती सदस्य असतील, प्रभागरचना कशी असेल याची उत्सुकता पारनेरकरांना होती. ‘एक प्रभाग एक सदस्य’ याप्रमाणे रचना असेल असे पूर्वीच ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. त्यानुसारच आता प्रभागरचना होऊन सतरा प्रभाग झाले आहेत. प्रभागरचना पुढीलप्रमाणे- प्रभाग एक-म्हस्के वस्ती, कुंभारवाडी, बेंद, शेळकेवस्ती, बोरूडेमळा. प्रभाग दोन-टेकवस्ती, शिंदेवस्ती, चत्तरवस्ती, भुसारेमळा, व्यवहारे मळा, खोडदेवस्ती, चौधरीवस्ती, खंडोबा मंदिर,गाडगेवस्ती, तराळवस्ती, प्रभाग तीन- तराळवाडी, शेरकरवस्ती, बडेवस्ती, संडकमळा, महाजन मळा, गायकवाड मळा, शेटेवस्ती, मते वस्ती, ठोंबरेवस्ती. प्रभाग-चार-बुगेवाडी गावठाण, वैद्य वस्ती, विधाटेवस्ती, सोबलेवाडी तलाव, खनवस्ती, शेरकरवस्ती, माळवाडी, प्रभाग पाच- पाटाडेमळा, तिरकळ मळा, वैद्य व पुजारी वस्ती, प्रभाग सहा- संकेत गॅस,चेडेवस्ती, घाडगेवस्ती, पुणेवाडीफाटा मारूती मंदिर, पुजारी मळा, प्रभाग सात- महादेव मंदिर, धान्य गोदाम, पोलीस लाईन, शिंदे वस्ती, इंदिरानगर, मनकर्णिका नगर, प्रभाग आठ- भैरवनाथ मंदिर, चांभार गल्ली, महादेव गल्ली, खेडेकर गल्ली, प्रभाग नऊ- लेंंडी नाला, वडारवाडा, राहुलनगर, मातंग वस्ती, नवरत्न गल्ली, माळ गल्ली, कुंभार गल्ली, प्रभाग दहा-तलाठी कार्यालय,आनंद नगर, प्राध्यापक कॉलनी, कॉलेजरोड, भालेकरवस्ती,
प्रभाग-अकरा-गणपत गल्ली, नागेश्वर गल्ली, बखळ गल्ली, नागेश्वर मंदिर, प्रभाग बारा-सेनापती बापट स्मारक, कावरेगल्ली, शेरकर गल्ली मोढवे वाडा,
प्रभाग तेरा- घोडकेगल्ली, काशीविश्वेशर मंदिर, कोर्टगल्ली, सुतारगल्ली, नांदेवाडा, प्रभाग-चौदा-ठोंबरेवस्ती, ठुबेवस्ती, देशमुख वस्ती, पंचायत समिती परिसर, चेडेवस्ती, पानोलीदरा, प्रभाग पंधरा- नागेश्वर वसाहत, ठुबेवस्ती, तक्का,बसस्थानक परिसर, प्रभाग सोळा- गंधाडेवस्ती, कांदा मार्केट, कावरेवस्ती, वरखडेमळा, तारडेवस्ती, प्रभाग सतरा-पठारेवस्ती, तलाव, कावरेवस्ती, मारूती मंदिर, वडनेर रोड, कन्हेरओहोळ, खोसेवस्ती, हंडेवस्ती, भिसे, औटी, देशमाने वस्ती.
(तालुका प्रतिनिधी)