मतमोजणी तयारीची प्रक्रिया पूर्ण

By Admin | Updated: June 27, 2023 13:24 IST2014-05-13T00:48:19+5:302023-06-27T13:24:27+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्र्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली.

Complete the process of counting the counting | मतमोजणी तयारीची प्रक्रिया पूर्ण

मतमोजणी तयारीची प्रक्रिया पूर्ण

अहमदनगर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्र्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली. येत्या शुक्रवारी (दि.१६) सकाळी आठ वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान, मतदारसंघातील मतदारसंख्येच्या प्रमाणात नगर दक्षिण मतदारसंघात मतमोजणीच्या जास्तीतजास्त २६ तर शिर्डीत २२ फेर्‍या होणार आहेत. मतमोजणीसाठी सुमारे एक हजार कर्मचारी आणि २०० च्या जवळपास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांनी दिली. दरम्यान, बुधवार (दि.१४) मोजणी प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी दोन्ही मतदारसंघातील मोजणी प्रक्रियेसाठी संबंधीत कर्मचार्‍यांना सकाळी सहापर्यंत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर उमेदवारांच्या प्रतिनिधींना सात वाजेपर्यंत बोलविण्यात आलेले आहे. त्यानंतर आठ वाजता प्रत्यक्ष मोजणीला सुरूवात होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाकडून एमआयडीसी येथे मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. जिल्हाधिकारी कवडे, उपजिल्हाधिकारी माळी लक्ष ठेवत आहेत. तसेच दैनंदिन भेटी सुरू आहेत. निवडणूक निरीक्षक बुधवारी नगरमध्ये दाखल होणार असून मतमोजणीच्या दिवशी सकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या टपाली मतपेट्या पोलीस व्हॅनमधून एमआयडीच्या गोदामात नेण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार मोजणी केंद्राच्या मुख्य प्रवेशव्दारा बाहेर स्थानिक पोलीस, गेट पासून तपासणी नाक्यावर केंद्रीय राखीव दलाचे जवान यांना तैनात करण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी आहे. (प्रतिनिधी) जेवणाचा खर्चही सादर करावा लागणार उमेदवारांना आपला निवडणुकीचा अंतिम खर्च सादर करण्यास निकालानंतर सुमारे महिनाभराचा कालावधी मिळणार आहे. विशेष म्हणजे मतमोजणीसाठी प्रतिनिधींना देण्यात येणार्‍या जेवणाचा खर्च ही त्यांना आपल्या अंतिम खर्चात सादर करावा लागणार आहे.

Web Title: Complete the process of counting the counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.