साईआधार रुग्णालयाविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:17+5:302021-07-29T04:22:17+5:30
एप्रिल, २०२१ मध्ये आपल्याला कोविडचा संसर्ग झाला होता. त्यानंतर, त्या साईआधार कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले. तेथे १५ दिवस ...

साईआधार रुग्णालयाविरुद्ध तक्रार
एप्रिल, २०२१ मध्ये आपल्याला कोविडचा संसर्ग झाला होता. त्यानंतर, त्या साईआधार कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले. तेथे १५ दिवस उपचार घेतले. रुग्णालयातून सुट्टी होताच, एक लाख १५ हजार रुपये बिलाची मागणी करण्यात आल्याची चंदेले यांची तक्रार आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे बिलासंदर्भात विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असे चंदेले यांचे म्हणणे आहे.
रुग्णालयाने अवास्तव बिल आकारत आर्थिक भुर्दंड केला. त्यामुळे स्वत:ला व कुटुंबीयांना मानसिक त्रास झाल्याने चौकशीची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. मंत्री टोपे यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. दरम्यान, तहसीलदार प्रशांत पाटील यांना याबाबत ‘लोकमत’ने विचारले असता, संबंधित रुग्णालयाबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. रुग्णालयात बिलांच्या तपासणीकरिता ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडून माहिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-------
साईआधार कोविड सेंटरबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रुग्णालयाने तक्रारदार महिलेला दिलेले उपचाराचे बिल पाहिले. त्यात स्वतंत्ररीत्या ऑक्सिजन बेडचे पैसे अकारण्यात आले आहेत. हा प्रकार नियमबाह्य आहे.
- पल्लवी निर्मळ, उपजिल्हाधिकारी, नगर.
---------
आरोपात तथ्य नाही
तक्रारदार महिलेच्या आरोपात तथ्य नाही. त्यांनी उपचाराचे बिल अदा केलेले नाही. न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने ‘लोकमत’ला देण्यात आली.
---------