मयताच्या वारसांना ४० लाखांची नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:00+5:302021-01-23T04:21:00+5:30

९ ऑक्टोबर २०१६ रोजी अर्जुन सुखदेव राजळे व इतर दोघे हे कारमधून पाथर्डी ते कासारपिंपळगाव रस्त्याने प्रवास करत होते. ...

Compensation of Rs 40 lakh to Mayata's heirs | मयताच्या वारसांना ४० लाखांची नुकसानभरपाई

मयताच्या वारसांना ४० लाखांची नुकसानभरपाई

९ ऑक्टोबर २०१६ रोजी अर्जुन सुखदेव राजळे व इतर दोघे हे कारमधून पाथर्डी ते कासारपिंपळगाव रस्त्याने प्रवास करत होते. त्यांची कार जुना कासारपिंपळगाव फाट्याजवळ आली तेव्हा भरधाव आलेल्या एका इन्होवा कारने राजळे यांच्या कारला धडक दिली होती. या अपघातात सुखदेव राजळे व इतर दोघे मयत झाले होते. सदरचा अपघात हा इनोव्हा कारचालकाच्या चुकीमुळे झाला होता. मयत अर्जुन राजळे हे वृद्धश्वर साखर कारखान्यावर मजूर म्हणून काम करत हाेते. मयताच्या वारसांना मोटार अपघात नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ॲड. व्ही. के. भोर्डे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. अर्जदारांनी सादर केलेला पुरावा व वकिलांच युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश आर.एम. कुलकर्णी यांनी नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Compensation of Rs 40 lakh to Mayata's heirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.