जिल्ह्यासाठी चार कोटींची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:29 IST2021-02-26T04:29:49+5:302021-02-26T04:29:49+5:30

अहमदनगर : गतवर्षी मार्च ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस झाला. चार तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाच हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे ...

Compensation of Rs. 4 crore for the district | जिल्ह्यासाठी चार कोटींची नुकसान भरपाई

जिल्ह्यासाठी चार कोटींची नुकसान भरपाई

अहमदनगर : गतवर्षी मार्च ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस झाला. चार तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाच हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची चार कोटी रुपयांची भरपाई शासनाने दिली आहे. यापोटी ४ कोटी २७ लाख रुपये जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

मार्च ते मे २०२० मध्ये अवकाळी पाऊस झाला होता. या पावसाने चार तालुक्यांतील तब्बल १३९ गावे बाधित झाली होती. ५ हजार ४८ शेतकऱ्यांच्या २ हजार ७०६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या भरपाईचे एकूण अनुदान ४ कोटी २७ लाख ८४ हजार इतके आहे. सदरचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे निचित यांनी सांगितले.

---------

तालुकानिहाय अनुदान

तालुका बाधित क्षेत्र (हेक्टर) भरपाई

पाथर्डी २१७५.९१ ३ कोटी ४८ लाख

शेवगाव २५१.६४ ३३ लाख ९७ हजार

कर्जत ११४.४८ १८ लाख ४ हजार

जामखेड १६४.३९ २ लाख ७० हजार---

Web Title: Compensation of Rs. 4 crore for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.