शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:13+5:302021-07-25T04:19:13+5:30
चितळी येथील सत्यम डिस्टलरीचे दोन दिवसांपूर्वी साठवण टाक्या भरल्याने ओवरफ्लो झालेले हे मळीचे दूषित पाणी कारखान्याच्या शेजारी रेल्वे लाईन ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
चितळी येथील सत्यम डिस्टलरीचे दोन दिवसांपूर्वी साठवण टाक्या भरल्याने ओवरफ्लो झालेले हे मळीचे दूषित पाणी कारखान्याच्या शेजारी रेल्वे लाईन लगतच्या शेतजमिनीत आले. ते पाणी आता विहिरी व कूपनलिका यांना उतरत असून येथील शेतकरी वर्गाच्या डाळींब बागा व इतर खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. लाखो रुपये खर्च करून डाळींब बाग टिकवली आहे. पदरमोड करून कधी उसनवारी करून फवारणी केली. मात्र, बाग जळण्याचा धोका तयार झाला असल्याचे येथील शेतकरी रवींद्र वाघ व सुरेश वाघ यांनी सांगितले. आसवणी व्यवस्थापन यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
यावेळी उपसरपंच नारायणराव कदम, सोपान वाघ, गणेश साळुंखे, दीपक वाघ, अशोक वाघ, ॲड. सचिन वाघ, रुपेश गायकवाड, राजू वाणी, नितीन वाकचौरे, सागर कातोरे, गोरख तनपुरे, संदीप वाघ, बाबासाहेब वाघ, बाळासाहेब वाघ, नंदू गायकवाड, जीवन वाघ, विक्रम वाघ, विष्णू वाघ, कैलास शिरगिरे उपस्थित होते.
२४ टाकळीभान