काष्टीसह पिंपळगाव पिसा येथे कंपार्टमेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:27+5:302021-04-09T04:22:27+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, पारगाव सुद्रिक गावात कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने काष्टी, पिंपळगाव ...

काष्टीसह पिंपळगाव पिसा येथे कंपार्टमेंट झोन
श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, पारगाव सुद्रिक गावात कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने काष्टी, पिंपळगाव पिसामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून कंपार्टमेंट झोन जाहीर केला आहे. काष्टीकरांनी पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवारपासून बेलवंडी, पारगाव ही गावे बंद करण्यात येणार आहेत.
शुक्रवारी तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, अपर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी काष्टी गावाला भेट दिली.
आमदार बबनराव पाचपुते, कैलास पाचपुते, उपसरपंच सुनील पाचपुते, लालासाहेब फाळके, सुनील दरेकर यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक झाली.
काष्टीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंपार्टमेंट झोन जाहीर केला गेला.
त्यामुळे काष्टी, पिंपळगाव पिसा येथील दवाखाने, मेडिकल पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, दूध डेअरीवगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
बेलवंडी, पारगावमध्ये शनिवारपासून पाच दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.
---
नव्या कोविड सेंटरसाठी हालचाली
श्रीगोंदा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवीन कोविड सेंटर सुरु करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा यांनी मंगल कार्यालय कोविड सेंटरसाठी देणार असल्याचे सांगितले.
--
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सर्व उपाय सुरू केले आहेत. सध्या २१८ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग अलर्ट आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक रूग्ण वाढणार नाहीत. कोणीही घाबरू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये.
-प्रदीप पवार,
तहसीलदार, श्रीगोंदा