साईनगरीतील सामुदायिक विवाह यंदा तीन टप्प्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:34+5:302021-03-07T04:19:34+5:30

माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. गेल्या २० वर्षांत सुमारे ...

The community wedding in Sainagari this year in three stages | साईनगरीतील सामुदायिक विवाह यंदा तीन टप्प्यांत

साईनगरीतील सामुदायिक विवाह यंदा तीन टप्प्यांत

माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. गेल्या २० वर्षांत सुमारे १,८५० हून अधिक जोडप्यांना विवाहबद्ध करून त्यांचे कन्यादान करण्याचे भाग्य या दाम्पत्याला लाभले आहे. कोरोनाच्या काळात गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे शिर्डीतील सर्वधर्मीय विवाह सोहळा स्थगित करण्यात आला होता. सध्या कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक विवाह सोहळ्याची आवश्यकता वाढली आहे.

आयोजक कैलास कोते म्हणाले, कोरोना पार्श्वभूमीवर यंदाचा शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. विवाह आई-वडील व मामा यांच्या उपस्थितीत लावण्यात येणार आहे. वधु-वरांच्या अन्य नातेवाईक अथवा मित्रांना या विवाहास उपस्थितीस मज्जाव करण्यात येणार आहे. आयोजकांकडून वधू-वरांना पोशाख, संसारोपयोगी वस्तू आणि वधुंना मंगळसूत्र भेट देण्यात येणार आहे. जेवणाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. १३ मे रोजी दुपारी १० वाजता साईप्रसाद अपार्टमेंटच्या प्रांगणात १० जोडप्यांचा, १४ मे रोजी सकाळी १० वाजता १० जोडपी आणि २२ मे रोजी १० जोडप्यांचा विवाह करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाचा सोहळा साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.

Web Title: The community wedding in Sainagari this year in three stages