आज अक्षयतृतीयेस शिर्डीत सामुदायिक विवाह
By Admin | Updated: April 27, 2017 18:51 IST2017-04-27T18:51:28+5:302017-04-27T18:51:28+5:30
साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने अक्षयतृतीयेच्या गोरज मुहुर्तावर २८ एप्रिलला विविध जाती धर्माच्या सुमारे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजिण्यात आला आहे.

आज अक्षयतृतीयेस शिर्डीत सामुदायिक विवाह
ल कमत आॅनलाईनशिर्डी : साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने अक्षयतृतीयेच्या गोरज मुहुर्तावर २८ एप्रिलला विविध जाती धर्माच्या सुमारे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजिण्यात आला आहे. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आहेत. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक व माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी केले आहे. गेल्या पंधरा वर्षात या उपक्रमाच्या माध्यमातून विविध जाती धर्मातील जवळपास दीड हजार जोडपी विवाहबद्ध झाली आहेत़ दुष्काळ व वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमिवर या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते़ विविध जातीधर्माच्या परंपरेनुसार वधू वरांचे विवाह लावले जातात. त्यांना नवा पोषाख, मंगळसूत्र, संसारापयोगी वस्तू व साई प्रतिमा भेट दिली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीत व संत महंताच्या उपस्थितीत हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा साजरा होणार आहे.