आयुक्तांचा पदभार जिल्हाधिका-यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 16:08 IST2019-05-21T16:08:22+5:302019-05-21T16:08:24+5:30
महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग मंगळवार (दि. २१) पासून १९ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. आयुक्तपदाचा पदभार पुन्हा एकदा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आला आहे.

आयुक्तांचा पदभार जिल्हाधिका-यांकडे
अहमदनगर : महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग मंगळवार (दि. २१) पासून १९ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. आयुक्तपदाचा पदभार पुन्हा एकदा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आला आहे. नगरविकास खात्याच्या निर्देशाप्रमाणे भालसिंग यांनी सोमवारी द्विवेदी यांच्याकडे पदभार सोपविला.
आयुक्त भालसिंग यांनी मुलाच्या लग्नासाठी रजा घेतली आहे. ते आता ७ जूनपर्यंत रजेवर असतील. नगरविकास खात्याने त्यांची रजा मंजूर केली. यापूर्वी महापालिकेला आयुक्त न मिळाल्याने द्विवेदी यांच्याकडेच पदभार होता. महापालिका निवडणूकही त्यांच्याच अधिपत्याखाली झाली होती. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर द्विवेदी यांच्याकडे पदभार आल्याने शहरातील नालेसफाई, सीना नदीच्या सफाईबाबत काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.