देवदैठण केंद्रात विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासाचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:32+5:302021-07-09T04:14:32+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण केंद्रातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासाचा श्रीगणेशा सुरू झाला. गृहभेटीच्या माध्यमातून अभ्यास घेतला जात ...

देवदैठण केंद्रात विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासाचा श्रीगणेशा
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण केंद्रातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासाचा श्रीगणेशा सुरू झाला. गृहभेटीच्या माध्यमातून अभ्यास घेतला जात आहे.
देवदैठण केंद्रातील देवदैठण, अलभरमळा, ढवळेवस्ती, मेखणी, कोरके वस्ती, सावंतवाडी, वाखारवाडी, शिंदेमळा, साकळाई मळा, वाघमारे वस्ती, लोखंडेवाडी, कोळपेवस्ती, मोटेवाडी, गव्हाणेवाडी, हिंगणी या सर्व शाळांमध्ये शिक्षक उपस्थित राहून ज्ञानदान करतात.
ढवळेवस्ती, हिंगणी व इतर शाळेत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाते तर काही शाळांमध्ये विद्यार्थी गट शिक्षण घेत आहेत. काही पालकांकडे मोबाईल नसल्याने तसेच मोबाईल रेंज मिळत नसल्याने त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गव्हाणेवाडी, अलभरमळा, लोखंडेवाडी, कोरके वस्ती शाळेतील शिक्षक गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेत आहेत.
मोटेवाडी शाळेला विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे यांनी अचानक भेट देऊन शालेय दप्तराची पहाणी केली. तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे का याची पहाणी केली. देवदैठणचे केंद्रप्रमुख बबन वेताळ यांनी कोरके वस्ती शाळेला भेट देऊन सेतू अभ्यासक्रमाविषयी माहिती घेतली. ते प्रत्येक शाळेला भेट देऊन शैक्षणिक आढावा घेत आहेत.
080721\img_20210705_160032.jpg
गव्हाणेवाडी शाळेतील शिक्षिका वंदना कारखिले गृहभेटीत विद्यार्थ्यांचा अभ्यास घेताना . ( छायाचित्र - संदीप घावटे )