कर्जतला फिरत्या दवाखान्याचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST2021-02-15T04:20:10+5:302021-02-15T04:20:10+5:30
कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघ कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आरोग्य सेवेपासून एकही गरजू वंचित ...

कर्जतला फिरत्या दवाखान्याचा प्रारंभ
कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघ कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आरोग्य सेवेपासून एकही गरजू वंचित राहणार नाही. यासाठी आता या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून घरपोहोच सुविधा उपलब्ध झाली असून तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांनी केले आहे.
कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था आमदार रोहित पवार यांचे माध्यमातून मोबाइल क्लिनिक व्हॅन (फिरता दवाखाना)चे हस्तांतरण व लोकार्पण सुनंदा पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सुचेता यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तापकीर, बापूसाहेब नेटके, सतीश पाटील, शहराध्यक्ष सुनील शेलार, मनीषा सोनमाळी, डॉ. प्रकाश भंडारी, डॉ. शबनम शेख, राजेश्वरी तनपुरे, मंदार काळदाते, भास्कर भैलुमे, सचिन कुलथे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, कृषी अधिकारी दीपक सुपेकर, एचडीएफसीचे विभाग प्रमुख हेमंत चव्हाण, शाखा व्यवस्थापक राजेंद्र बिलावर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. नितीन पिसाळ यांनी केले. डॉ. सुचेता यादव यांनी आभार मानले.