औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:24+5:302021-07-16T04:15:24+5:30

२४ आठवड्यांच्या कार्यक्रम असून पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. यात वेगवेगळी प्रात्यक्षिके करणे, शेती प्रश्नावली, वेळापत्रक ...

Commencement of industrial work experience program | औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाला सुरुवात

औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाला सुरुवात

२४ आठवड्यांच्या कार्यक्रम असून पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. यात वेगवेगळी प्रात्यक्षिके करणे, शेती प्रश्नावली, वेळापत्रक भरणे, विस्तार कार्यक्रम घेणे, याबाबत माहिती देण्यात आली. माती-पाणी परीक्षण, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, चारा-पीक नियोजन, विविध विषयांवरील प्रात्यक्षिके, ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा नवनवीन तंत्रज्ञानातील सहभाग, असे विविध उपक्रम कृषिदूत आणि कृषिकन्या त्यांच्या मूळगावी राबवित आहेत.

श्रमशक्ती शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष साहेबराव नवले, प्राचार्य डॉ. अशोक कडलग, उपप्राचार्य डॉ. अरविंद हारदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. पी. तायडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. बी. धांगडा, डॉ. काळे, टी. डी. साबळे, व्ही. डी. वाळे, ए. बी. जंजिरे, पी. जे. शेडगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Commencement of industrial work experience program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.