दिलासादायक ! ऑक्सिजनची चिंता मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:20 IST2021-04-24T04:20:58+5:302021-04-24T04:20:58+5:30

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. नगरमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे दोन ...

Comfortable! Oxygen anxiety will go away | दिलासादायक ! ऑक्सिजनची चिंता मिटणार

दिलासादायक ! ऑक्सिजनची चिंता मिटणार

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. नगरमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे दोन प्रकल्प सुरू झाले आहेत. नागापूर औद्योगिक वसाहतीत बंद पडलेला ऑक्सिजनचा कारखाना कार्यान्वित झाला असून, जिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन निर्मिती शुक्रवारी सुरू झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी दिवसाला ६ टन २५ किलो लिटर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्याला दररोज ५० जे ६० टन ऑक्सिजनची गरज भासत आहे; परंतु त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनचे बेड मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक धावपळ करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेला ऑक्सिजनचा प्लांट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. महापौर बाबासाहेब वाकळे हा प्लांट सुरू करण्यासाठी आग्रही होते. त्यांनी वेळोवेळी प्लांटला भेट देऊन माहिती घेतली. अखेर गुरुवारी रात्री उशिराने हा प्लांट सुरू झाला. महापौर वाकळे यांनी रात्री प्लांटची पाहणी करून वितरणाबाबत सूचना केल्या. या प्लांटमध्ये दिवसाला ५ टन म्हणजे ६०० टाक्या ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार असून, हा ऑक्सिजन शहरातील खाजगी रुग्णालयांना वितरित केला जाणार आहे. दुसरा प्लांट जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे. या प्लांटमध्ये दररोज १ टन २५ किलो लिटर ऑक्सिजन तयार होणार आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजनच्या मागणीत काही अंशी घट होणार आहे.

....

ऑक्सिजनसाठी रांगा

नागापूर औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजनचा प्लांट सुरू झाल्याची माहिती मिळताच ऑक्सिजनच्या टाक्या घेण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभरात ६०० टक्यांचे वितरण करण्यात आले.

...

- ऑक्सिजनचा नागापूर औद्योगिक वसाहतीतील एक व दुसरा जिल्हा शासकीय रुग्णालयातील, असे दोन प्लांट सुरू झाले आहेत. या दोन्ही प्लांटमधून दररोज ६ टन २५ किलो लिटर ऑक्सिजन उपलब्ध होईल.

- संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: Comfortable! Oxygen anxiety will go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.