दिलासादायक.....दोन दिवसात कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 12:01 IST2020-10-07T12:00:43+5:302020-10-07T12:01:07+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ४१६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दिवसभरात ४५२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ३ हजार ६८८ जणांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

दिलासादायक.....दोन दिवसात कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ४१६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दिवसभरात ४५२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ३ हजार ६८८ जणांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७१ आणि अँटीजेन चाचणीत ३०६ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (५५), कर्जत (२३), कोपरगाव (१८), नगर ग्रामीण (३०), नेवासा (१७), पारनेर (२०), पाथर्डी (३९), राहाता (६६), राहुरी (२७), श्रीगोंदा (२५), अकोले (१५), संगमनेर (३०), श्रीरामपूर (१६), जामखेड (३६), शेवगाव (२५) येथील रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी घरी सोडलेल्या ४१६ मध्ये नगर ३१, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १, नेवासा ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहाता ३४, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव २६, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १७, भिंगार २ येथील रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे.