भातकुडगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

By Admin | Updated: June 8, 2017 13:45 IST2017-06-08T13:45:21+5:302017-06-08T13:45:21+5:30

शेवगाव - नेवासा मार्गावरील भातकुडगाव फाटा येथे शेतकरी बचाव जनआंदोलनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

Combustion of the Chief Minister's statue at Bhatkudgaon | भातकुडगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

भातकुडगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

आॅनलाईन लोकमत
भातकुडगाव, दि़ ८ - शेवगाव - नेवासा मार्गावरील भातकुडगाव फाटा येथे शेतकरी बचाव जनआंदोलनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न देता शेतकरी संपात फूट पाडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकरी बचाव जनआंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे, जि. प. सदस्य रामभाऊ साळवे यांच्यासह शेतकऱ्यांनी केला. यावेळी बाळासाहेब काळे, राजेंद्र आढाव, भाऊसाहेब सामृत, ज्ञानदेव खरड, बाळासाहेब जाधव, शंकर नारळकर, अण्णासाहेब दुकळे, अशोक दुकळे, विठ्ठल फटांगरे, मारूतराव जाधव, शहाराम आगळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Combustion of the Chief Minister's statue at Bhatkudgaon