कोरोनाच्या प्रादुर्भावतही रंगली टांगा शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:19 IST2021-03-22T04:19:49+5:302021-03-22T04:19:49+5:30

अहमदनगर : नगर तालुक्यातील कल्याण रोडवरील हिंगणगाव फाटा येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून टांगा शर्यत काढणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल ...

Colorful leg race even in the corona outbreak | कोरोनाच्या प्रादुर्भावतही रंगली टांगा शर्यत

कोरोनाच्या प्रादुर्भावतही रंगली टांगा शर्यत

अहमदनगर : नगर तालुक्यातील कल्याण रोडवरील हिंगणगाव फाटा येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून टांगा शर्यत काढणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली.

प्राण्यांना टांग्याला जुंपून शर्यत आयोजित करण्यावर शासनाकडून बंदी आहे, तसेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने नियम लागू केले आहेत. काही हौशी लोकांनी मात्र रविवारी सकाळी टांग्याला घोडे जुंपून शर्यतीचे आयोजन केले होते. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना माहिती मिळाली होती. अधीक्षकांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन तीन टांगे जप्त केले, तसेच याप्रकरणी बंडू दगू बडे, रावसाहेब दगू बडे (दोघे रा. मेहकरी, ता. नगर) व प्रकाश मच्छिंद्र पोटे (रा. बारदरी, ता. नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक सचिन गायकवाड यांनी फिर्याद दिली.

Web Title: Colorful leg race even in the corona outbreak