महाविद्यालयांनी स्वायत्त होणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:35+5:302021-09-04T04:26:35+5:30

येथील बोरावके महाविद्यालयात ‘स्वायत्त महाविद्यालय काळाची गरज’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ. बोबडे बोलत होते. अध्यक्षस्थानी मीनाताई जगधने होत्या. ...

Colleges need time to become autonomous | महाविद्यालयांनी स्वायत्त होणे काळाची गरज

महाविद्यालयांनी स्वायत्त होणे काळाची गरज

येथील बोरावके महाविद्यालयात ‘स्वायत्त महाविद्यालय काळाची गरज’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ. बोबडे बोलत होते. अध्यक्षस्थानी मीनाताई जगधने होत्या.

डॉ. बोबडे यांनी स्वायत्त व बिगर स्वायत्त यामधील फरक यावर मार्गदर्शन केले. महाविद्यालय स्वायत्ततासंबंधी गैरसमजुती किती चुकीच्या आहेत हे त्यांनी सांगितले. बोरावके महाविद्यालय स्वायत्त होण्यासाठी येथे अनुकूल परिस्थिती व अनुभवी प्राध्यापक आहेत. केवळ काळाच्या आणि विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. तरच समाजाचा आपल्यावर विश्वास बसतो. मानसिकतेत बदल करून स्वायत्त महाविद्यालयाला सामोरे जावे. तीच महाविद्यालये भविष्य काळात तग धरतील, असे डॉ. बोबडे यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात मीनाताई जगधने यांनी महाविद्यालये स्वायत्त होण्यासाठी डॉ. बोबडे यांचे विचार प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी करून दिला. प्रा. डॉ. प्रवीण बदधे यांनी आभार मानले. उपप्राचार्य डॉ. एस. पी. चोळके, डॉ. ए. एन. जगदाळे, प्रा.डॉ. एस. जी. वैद्य उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अशोक माहुरे यांनी केले.

--------

Web Title: Colleges need time to become autonomous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.