जिल्हाधिकाऱ्यांनी केली ड्रोन मोजणीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:01+5:302020-12-16T04:36:01+5:30
मागील अठरा दिवसांपासून भूमी अभिलेखचे १२ अधिकारी व ४० कर्मचारी मोजणी काम करीत आहेत. मूळ जुना अभिलेख, त्यावर माजी ...

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ड्रोन मोजणीची पाहणी
मागील अठरा दिवसांपासून भूमी अभिलेखचे १२ अधिकारी व ४० कर्मचारी मोजणी काम करीत आहेत. मूळ जुना अभिलेख, त्यावर माजी टिपणी, शंखू साखळी फाळणी नकाशा याचा वापर करून चालू वहिवाट व तफावत याचा मेळ लावत, न्यायालयीन तंटेबखेडे विचारात घेऊन मोजणी काम अंतिम टप्प्याकडे जात आहे. भूमी अभिलेखचे उपअधीक्षकांवर जबाबदारी निश्चित करून ७ टीम तयार केल्या असून, ५२ अधिकारी, कर्मचारी मोजणी काम करीत आहेत. गत पंधरवड्यात राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अधिलेखचे संचालक एस. चोकलिंगम व नाशिक प्रदेशचे भूमी अभिलेख उपसंचालक अजय कुलकर्णी यांनी आंबडला भेट देऊन सूचना केल्या.
रविवारी जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी
जिल्हा अधिक्षक विष्णू शिंदे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक दादासाहेब सोनवणे, नितीन सूर्यवंशी, दुरुस्ती लिपिक संदीप आभाळे, गंगाराम पवार, नितीन मडके, गावकरी सुनील नाईकवाडी, गिरजाजी जाधव, सरपंच दत्तू धोंडिबा जाधव, नामदेव जाधव, भाऊसाहेब कानवडे, माजी सरपंच रोहिदास जाधव, माधव धोंडिबा भोर, भूषण जाधव, सुधीर कानवडे, कैलास कानवडे आदी उपस्थित होते.