म्हसणे फाटा येथे सीएनजी पंप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:53+5:302021-02-25T04:25:53+5:30

पळवे : पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे मंगळवारी सीएनजी गॅस पंपाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले. नगर ...

CNG pump started at Mhasne Fata | म्हसणे फाटा येथे सीएनजी पंप सुरू

म्हसणे फाटा येथे सीएनजी पंप सुरू

पळवे

: पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे मंगळवारी सीएनजी गॅस पंपाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले.

नगर जिल्ह्यात पहिल्याच सीएनजी गॅस कंपनीचा पंप सुरु झाल्याने ग्राहकांना चांगली सुविधा मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले. आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पहिला गॅस पंप होऊन जनतेची हाच गॅस भरण्यासाठी जाण्याची ससेहोलपट थांबली असल्याचे मत व्यक्त केले. पुढील गॅस पंपचा प्रोजेक्ट अहमदनगरमध्ये उपलब्ध करणार आहे. हा गॅस प्रदूषणरहित असणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक श्रीपाद मांडके यांनी सांगितले.

यावेळी गॅस कंपनीचे कैलास कुलकर्णी, दिनेश गाडिलकर, बजरंग राठोड, मनोज अडिगोपुला, विराज केलुसकर, प्रतिक गायकवाड, पारनेर तहसीलदार ज्योती देवरे, प्रांताधिकारी भोसले, समर्थ पंपाचे संचालक कैलास गाडिलकर उपस्थित होते.

सूत्रसंचालन डॉ. अरुणा भांबरे तर आभार दिनेश गाडगीळ यांनी मानले. (वा. प्र.)

...

Web Title: CNG pump started at Mhasne Fata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.