शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खरंच पाच नगरसेवकांसाठी मुख्यमंत्री संतप्त? सेना-राष्ट्रवादीत चर्चेला उधाण

By सुधीर लंके | Updated: July 8, 2020 06:07 IST

पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी गत आठवड्यात बारामतीला जाऊन अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

- सुधीर लंकेअहमदनगर: पारनेर नगरपंचायतच्या पाच नगरसेवकांसाठी खरोखरच उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे का? याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. विधानसभेपूर्वीच तेथे सेनेत धुसफूस होती. त्यातूनच हे बंड घडले असून यास आम्ही नव्हे तर सेनाच जबाबदार आहे, असे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी गत आठवड्यात बारामतीला जाऊन अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार निलेश लंके यांची ताकद त्यामुळे वाढली आहे. या नगरसेवकांच्या पक्षांतराची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून ‘आमचे नगरसेवक परत पाठवा’, असा संदेश त्यांनी महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला पाठविला असल्याची चर्चा मुंबईत रंगली आहे.पारनेर हा विधानसभेचा मतदारसंघ सेनेने गत निवडणुकीत गमावला आहे. सेनेचे नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचा लंके यांनी येथे पराभव केला. लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत. सेनेचे तालुकाप्रमुख होते. औटी व त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. उद्धव ठाकरे हे २०१८ साली पारनेर दौऱ्यावर असताना लंके समर्थकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप झाला होता. तेव्हापासून लंके चर्चेत आहेत. सेना व त्यांच्यात तेव्हापासून जोरदार संघर्ष आहे. ही किनारही ठाकरे यांच्या नाराजीला असू शकते. सेनेने येथील नगरपंचायतची सत्ता ही विधानसभा निवडणुकीपूर्वीच गमावलेली आहे. या नगरपंचायतीत १७ सदस्यांपैकी ९ सेनेचे आहेत. पहिल्या अडीच वर्षात सेनेचाच नगराध्यक्ष होता. नंतरच्या अडीच वर्षात मात्र सेनेत बंडखोरी होऊन अपक्षाला नगराध्यक्षपद मिळाले. विधानसभेपूर्वीच हे बंड झाले होते. त्यामुळे आजच्या पक्षांतरालाही आम्ही जबाबदार नसून सेनेतील अंतर्गत नाराजी जबाबदार असल्याचे राष्टÑवादीचे म्हणणे आहे. अर्थात नगरपंचायतची निवडणूक तोंडावर असल्याने येथील सध्याच्या पक्षांतराचा लगेच नगराध्यक्ष पदावर काहीही परिणाम संभवत नाही.पारनेरच्या शिवसेनेत अगोदरपासून धुसफूस आहे. अंतर्गत मतभेदांमुळे सेनेला बहुमत असूनही नगराध्यक्षपद राखता आलेले नाही. सेनेचे पाच नगरसेवक भाजपात निघाले होते. त्यांना राष्ट्रवादीत घेतले. यात चुकीचे काय आहे? मुख्यमंत्र्यांनीही याबाबत हरकत घेतली असेल असे आपणाला वाटत नाही. ही चर्चा केवळ मीडियात आहे.- राजेंद्र फाळके,जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादीआपल्यादृष्टीने पक्षांतराचा हा विषय संपलेला आहे. आपणाला या विषयावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही.- विजय औटी,माजी आमदार, शिवसेनाशिवसेनेचे कोणते नगरसेवक पक्ष सोडून गेले ती माहिती मातोश्रीने मागितली होती. ती यादी दिली. इतर काय घडामोडी सुरु आहेत, किंवा मुख्यमंत्री काय बोलले? हे माहित नाही.- शशिकांत गाडे, दक्षिण जिल्हा प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAhmednagarअहमदनगर