ढगाळ हवामानाचा कांदा पिकास फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:23+5:302021-03-07T04:19:23+5:30

खराब हवामानामुळे फवारणीच्या खर्चात वाढ होताना दिसून येत आहे. यावर्षी कांदा बियाण्यांचा तुटवडा असल्याने कांदा लागवडीचा भांडवली खर्च मोठ्या ...

Cloudy weather hits onion crop | ढगाळ हवामानाचा कांदा पिकास फटका

ढगाळ हवामानाचा कांदा पिकास फटका

खराब हवामानामुळे फवारणीच्या खर्चात वाढ होताना दिसून येत आहे. यावर्षी कांदा बियाण्यांचा तुटवडा असल्याने कांदा लागवडीचा भांडवली खर्च मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यातच पाऊसही मोठ्या प्रमाणात झाला असल्याने त्याचाही कांदा पिकाला फटका बसला होता. मध्यंतरी गारपीट झाल्यानेही कांद्याचे नुकसान झाले. यावर्षी कांद्याच्या भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर अळी, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे. त्यातच इंधनाचे बाजारभाव प्रचंड वाढल्याने मशागतीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे खर्च वाढलेला असताना भावही टिकून राहण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.

............

ढगाळ हवामानामुळे कांद्यावर मावा, तुडतुडे व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. औषध फवारणीमुळे भांडवली खर्चात वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यातच कोरोनामुळे शेती पिकांना बाजारभाव मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करावीत किंवा मार्चअखेर भरावयाच्या पीककर्जास शासनाने स्थगिती द्यावी.

- रामभाऊ पंरडवाल,

कांदा उत्पादक शेतकरी, अळकुटी,

..............

गेल्या आठ दिवसांपासून पारनेर तालुक्यात ढगाळ हवामान तयार होत असून याचा कांदा पिकास मोठा फटका बसला असून कांद्यावर मावा, तुडतुडे, लाल कोळीचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने शेतकऱ्यांनी ताबडतोब औषध फवारणी करणे गरजेचे आहे. बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी केल्यास होणारे कांदा पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येईल.

-

विशाल माने,

कृषी सल्लागार, अळकुटी ,

फोटो आहे.

Web Title: Cloudy weather hits onion crop