‘प्रसाद शुगर’ बंद करून ‘तनपुरे’ चालवून दाखवा

By Admin | Updated: June 14, 2016 23:23 IST2016-06-14T23:16:17+5:302016-06-14T23:23:34+5:30

राहुरी : प्रसाद शुगर कारखाना बंद करून राहुरी येथील तनपुरे कारखाना सुरू करण्याची हिंमत विरोधकांकडे आहे का? असा खडा सवाल करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी प्रसाद तनपुरेंसह विरोधकांवर डोफ डागली.

Close 'Prasad Sugar' and run 'Tanpura' by running | ‘प्रसाद शुगर’ बंद करून ‘तनपुरे’ चालवून दाखवा

‘प्रसाद शुगर’ बंद करून ‘तनपुरे’ चालवून दाखवा

राहुरी : वांबोरी येथील खासगी प्रसाद शुगर कारखाना बंद करून राहुरी येथील तनपुरे कारखाना सुरू करण्याची हिंमत विरोधकांकडे आहे का? असा खडा सवाल करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी प्रसाद तनपुरेंसह विरोधकांवर डोफ डागली. ज्यांनी कारखाना बंद करण्याचे पाप केले, त्यांना मतदार खड्यासारखे बाजूला करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तनपुरे कारखाना निवडणूक प्रचार सभेची सांगता राहुरी येथे मंगळवारी सायंकाळी झाली. त्यावेळी विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी गणपतराव उंडे होते. सभेत विखे यांनी विरोधकांचा समाचार घेतला़ सहकारी कारखाना बंद पाडून या मंडळींनी सभासद व कामगारांना उद्धस्त केले आहे. गणेश कारखान्याप्रमाणे तनपुरे कारखाना भाडेपट्ट्यावर घेतला जाईल़ कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेऊन उस उत्पादकांना पेमेंट व कामगारांचे पगार केले जातील, अशी ग्वाहीही विखे यांनी दिली़
तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी विखे कारखान्यावर कर्जाचा बोजा चढविण्यात येणार आहे. तनपुरे कारखान्याच्या जमीन, इमारत व खुद्द शिवाजी महाराज पुतळ्यावरही कर्ज आहे़ त्यामुळे प्रवरेशिवाय कारखान्याची हमी कोण घेणार? असा सवाल त्यांनी केला. कारखान्याचे नावही आम्ही बदलणार नाही. या कारखान्याचे सामान त्या कारखान्यात नेण्याचे पापही आमच्याकडून होणार नाही, तशी आमची संस्कृती नाही. आमच्याकडे शिक्षण संस्था असल्याने तनपुरे कारखान्याच्या शिक्षण संस्थावरही आमचा डोळा नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
आम्ही पाण्यासाठी भांडलो व न्याय मिळवून दिला. मुळा-प्रवरा सोसायटीमध्ये सभासद व कामगारांना न्याय मिळवून दिला. तोच न्याय तनपुरेच्या सभासद व कामगारांना देऊ, असे ते म्हणाले. जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील, काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, रावसाहेब तनपुरे, डॉ़ धनंजय मेहेत्रे, शिवाजी तारडे यांची भाषणे झाली़ सूत्रसंचालन जयंत कुलकर्णी यांनी केले़ रामदास धुमाळ, रावसाहेब साबळे, सुरेश करपे, तानाजी धसाळ, संपतराव सिनारे, सुरेश येवले, सोपानराव म्हसे, किशोर वने, सभापती मंगल निमसे, मंदाताई डुक्रे, सचिन गुजर आदी उपस्थित होते़
‘कारखान्याचे धुराडे यंदाच पेटवू’
डॉ़ सुजय विखे म्हणाले की, याच वर्षी तनपुरे कारखान्याच्या चिमणीमधून धूर काढू.विरोधकांच्या खासगी कारखान्याने प्रतिटन ४५० रूपये भाव कमी दिला़ आम्ही भाव कमी दिला याचा पुरावा खासगी कारखाने चालविणाऱ्यांनी द्यावा़ कारखाना बंद पाडणाऱ्यांनी उसाचे पेमेंट दिले नाही, त्या रकमेसह यादी आपण सभेत वाटली़ मिटकॉन ही बँक आहे असे समजणारे शिवाजी गाडे हे सभापतीपदासाठी मागे लागले होते़ विरोधक एकत्र आले असले तरी तनपुरे कारखान्यात परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़

Web Title: Close 'Prasad Sugar' and run 'Tanpura' by running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.