लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:18+5:302020-12-27T04:16:18+5:30

अहमदनगर : जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांची तातडीने सोडवणूक होणे ...

The clerk will follow up on staff questions | लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार

लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार

अहमदनगर : जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांची तातडीने सोडवणूक होणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच ग्रामविकासमंत्री तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमवेत बैठक घेवून पाठपुरावा करू, असे आश्वासन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने याबाबत आ. तांबे यांना निवेदन दिले. यावेळी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतन, त्रुटी, बदल्या, शिक्षण विभागातील सुधारित आकृतिबंध, पदोन्नती, प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकांच्या अडचणी, कक्ष अधिकारी यांना वर्ग-२ चा दर्जा, वरिष्ठ सहाय्य पद १०० टक्के पदोन्नतीने भरणे, गृहबांधणी कर्ज तसेच जिल्हास्तवरील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर, विभागीय अध्यक्ष अशोक कदम, जिल्हाध्यक्ष कैलास डावरे, कोषाध्यक्ष भरत घुगे, कार्याध्यक्ष गणेश तोटे, राजेश तिटमे, संतोष खैरनार, चेतन चव्हाण, रामदास मिसाळ ,संजय आरगडे, दीपक जोशी, संतोष देशमुख, शांताराम आव्हाड, प्रवीण कुर्हे, विकास वर्पे, जगदीश पवार, प्रदीप कुदळ, किशोर कुलथे आदींसह लिपिकवर्गीय कर्मचारी उपस्थित होते.

---------

फोटो - २६तांबे निवेदन

जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या प्रश्नासंदर्भात आमदार सुधीर तांबे यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: The clerk will follow up on staff questions