कोपरगाव : येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सच्च्छता दूत आदिनाथ ढाकणे हे शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची सेवाभावाने सातत्याने प्रत्येक शनिवारी स्वच्छता करीत आहेत. या उपक्रमाला शनिवारी (दि. ३०) शंभर आठवडे पूर्ण झाल्याने मान्यवरांच्या उपस्थितीत गोदावरी नदीचे पूजन करून आदिनाथ ढाकणे यांच्यासमवेत सौरभ मुंगसे, नीलेश पाटील, सोमनाथ पाटील, प्रज्वल ढाकणे, गौरव रोकडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फूलसौंदर, नाशिक येथील नमामी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, प्रतिष्ठित व्यापारी नारायण अग्रवाल, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, आण्णा वैद्य, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. यादव, प्रा. गणेश देशमुख, प्रा. रवींद्र जाधव, बाळासाहेब आव्हाड, आनंद कवळे, मनीष कोठारी, शैलेंद्र बनसोडे, महारुद्र गालट, सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला, प्रदीप गुरली, विजय सांगळे उपस्थित होते. यावेळी काका कोयटे, प्रशांत सरोदे, सुधीर डागा, बी. सी. यादव, राजेश पंडित, नारायण अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आदिनाथ ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शैलेंद्र बनसोडे यांनी केले. सचिन तांबे यांनी आभार मानले.
......................
फोटो३०- गोदामाई प्रतिष्ठान सत्कार - कोपरगाव