नाला साफ करुन मला फोटो पाठवा- आदित्य ठाकरेंचे नगरच्या मनपा आयुक्तांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:31 IST2019-07-22T14:21:10+5:302019-07-22T14:31:28+5:30

ठाकरे यांनी राधाबाई काळे महिला महाविद्यालय गाठून परिसराची पाहणी केली. हा नाला व परिसराची साफसफाई दोन दिवसात करुन मला फोटो पाठवा, असा आदेश ठाकरे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिला.

Clean the drain and send me the photo- Aditya Thackeray's municipal commissioner order | नाला साफ करुन मला फोटो पाठवा- आदित्य ठाकरेंचे नगरच्या मनपा आयुक्तांना आदेश

नाला साफ करुन मला फोटो पाठवा- आदित्य ठाकरेंचे नगरच्या मनपा आयुक्तांना आदेश

अहमदनगर : येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या परिसरात घाण असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा संवाद कार्यक्रमात केली. त्यानंतर ठाकरे यांनी तात्काळ महाविद्यालय गाठून परिसराची पाहणी केली. हा नाला व परिसराची साफसफाई दोन दिवसात करुन मला फोटो पाठवा, असा आदेश ठाकरे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिला.
ठाकरे यांच्यासोबत आलेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही आयुक्तांना सुचना देत साफसफाईबाबत अहवाल पाठविण्यास बजावले. तसेच शहरातील प्लॅस्टिक बंदीबाबतही त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर राधाबाई काळे महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या परिसरात ग्रीन बेल्ट विकसीत करावा, अशा सुचनाही मंत्री कदम यांनी आयुक्तांना दिल्या.

Web Title: Clean the drain and send me the photo- Aditya Thackeray's municipal commissioner order