शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत

By Admin | Updated: May 12, 2016 23:57 IST2016-05-12T23:53:08+5:302016-05-12T23:57:10+5:30

अहमदनगर : शहर पाणी पुरवठा योजनेचा मुळानगर येथील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही तासातच धामोरी फाट्याजवळ मुख्य जलवाहिनी फुटली.

The city's water supply is again disrupted | शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत

शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत

अहमदनगर : शहर पाणी पुरवठा योजनेचा मुळानगर येथील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही तासातच धामोरी फाट्याजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी दिवसभर विस्कळीत झाला. महापालिकेने तातडीने जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. शहराला निर्धारित वेळेत व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात व्यत्यय येत आहे.
वादळी वाऱ्यामुळे बुधवारी सायंकाळी ४ ते ६ या काळात मुळानगर येथील वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे धरणातून पाणी उपसा होऊ शकला नाही. सायंकाळी सात वाजता वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला. मुळानगर, विळद येथून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रात्री एक वाजेच्या सुमारास शहर पाणी पुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी धामोरी फाटा येथे तडा जाऊन फुटली. महापालिकेने तातडीने रात्रीच जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतले.
(प्रतिनिधी)

Web Title: The city's water supply is again disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.