पाऊस येताच शहराचे पाणी बंद!
By Admin | Updated: June 5, 2014 00:08 IST2014-06-04T23:22:25+5:302014-06-05T00:08:26+5:30
अहमदनगर: मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसला. वीज वाहक तारा तुटल्याने वसंत टेकडी येथील पाणी उपसा करणारे पंप बंद पडले.

पाऊस येताच शहराचे पाणी बंद!
अहमदनगर: मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसला. वीज वाहक तारा तुटल्याने वसंत टेकडी येथील पाणी उपसा करणारे पंप बंद पडले. त्यातच बुधवारी देहरे गावाजवळ मुख्य पाईपलाईनही लिकेज झाली. दोन दिवस शहरातील काही उपनगरांना पाणी पुरवठा झालेला नाही. वादळी पावसाने वसंत टेकडी परिसरात वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा करणार्या मुख्य वीज वाहिनीच्या तारा तुटल्या. त्याचप्रमाणे येथील रोहित्रही नादुरूस्त झाले. खंडित वीज पुरवठा व नादुरूस्त रोहित्र यामुळे वसंत टेकडी येथून होणारा पाणी उपसा बंद पडला. वीज वितरण कंपनीने तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले असून पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईल अशी माहिती महापौर संग्राम जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी दिली. या तांत्रिक अडचणीमुळे सावेडी उपनगर, गुलमोहर रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगरचा काही भाग तसेच रेल्वेस्टेशन रस्ता, विनायकनगर, आगरकर मळा, केडगावातील काही भागास बुधवारी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. बुधवारी देहरे गावाजवळ जुनी मुख्य जलवाहिनी पाणी व हवेच्या दाबाने लिकेज झाली. जलवाहिनी दुरूस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले असले तरी त्यास विलंब लागणार आहे. (प्रतिनिधी)