नगरचा पारा चाळीशीनजीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:18 IST2021-04-03T04:18:23+5:302021-04-03T04:18:23+5:30
नगर जिल्ह्यात १ मार्चपासूनच उन्हाचा तडाखा जाणवायला लागला. मात्र, मध्यंतरी काही ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली. त्यामुळे आठवडाभर ...

नगरचा पारा चाळीशीनजीक
नगर जिल्ह्यात १ मार्चपासूनच उन्हाचा तडाखा जाणवायला लागला. मात्र, मध्यंतरी काही ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली. त्यामुळे आठवडाभर ऊन कमी होते. मागील सात-आठ दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली असून दुपारचे तापमान ३५ अंशांच्या पुढे नोंदले जात आहे. गुरुवारी, शुक्रवारी दोन्ही दिवस नगरचे कमाल तापमान अनुक्रमे ३७ व ३८ अंश सेल्सिअस होते. कमाल तापमानही २८ ते ३० अंशांपर्यंत पोहोचत आहे. मध्यरात्रीपासून पुढे कमाल तापमान कमी होत पहाटे २० ते २२ अंशांपर्यंत येते. सकाळी आठ वाजेपासूनच यात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊन असल्याने पारा ३५ ते ४० अंश दरम्यान राहत आहे. पुढील आठवड्यात पारा चाळीस अंशांच्या पुढे जाईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.