एका क्लिकवर आता नगर पर्यटन

By Admin | Updated: May 27, 2016 23:25 IST2016-05-27T22:57:56+5:302016-05-27T23:25:17+5:30

संदीप रोडे, अहमदनगर नगर शहराची ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक माहिती असलेले अ‍ॅप उपायुक्त अजय चारठाणकर यांनी विकसित केले आहे.

City tourism with one click | एका क्लिकवर आता नगर पर्यटन

एका क्लिकवर आता नगर पर्यटन

संदीप रोडे, अहमदनगर
नगर शहराची ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक माहिती असलेले अ‍ॅप उपायुक्त अजय चारठाणकर यांनी विकसित केले आहे. एक क्लिकवर त्या माध्यमातून नगर शहरातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून नगरचे नाव जगभर झळकणार आहे. स्थापना दिनी (२८ मे) त्याचे लाँचिंग केले जाणार आहे. पर्यटन स्थळांचे फोटोही त्यावर असणार आहेत.
नगर जिल्ह्यातील शिर्डी व शिंगणापूर येथे देशभरातून पर्यटक येत असतात. नगर शहरात भुईकोट किल्ला, महल, किल्ल्यातील नेता कक्ष, मेहेराबाद, रणगाडा संग्रहालय, हिवरेबाजार, दमडी मशीद अशी ऐतिहासिक ठिकाणं आहे. मात्र त्याची माहिती शिर्डीत येणाऱ्या पर्यटकांना असतेच असं नाही. माहिती नसल्याने नगर शहरात पर्यटक येत नाहीत. नगर शहराची ही माहिती जगभर जावी या हेतूने चारठाणकर यांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅप विकसित करत असताना महापालिकेला एक रुपयाचाही खर्च आलेला नाही हे विशेष. प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. नगर शहरात प्रवेश करताच ते अ‍ॅप शहरातील पर्यटनस्थळांची माहिती देईल. निगेव्हीशेन असल्याने किती अंतरावर आहे. तेथे कसे जायचे याची माहितीही पर्यटकांना मिळणार आहे. जगाच्या पाठीवर कोठेही बसून नगर शहरातील पर्यटनाची माहिती अ‍ॅपच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. पर्यटन मार्गदर्शन केंद्रही महापालिकेच्यावतीने सुरू केले जाणार आहे. त्यासाठी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. नगर शहरातील व्यापार, रोजगार निर्मिती व पर्यटनाची सांगड घालत हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. सुरूवातीला अ‍ॅपवर पर्यटनाची माहिती असली तरी नंतर त्यावर हॉटेल, वैद्यकीय सुविधा, व्यापार याची माहिती लोड केली जाणार आहे.
देशात ठरेल मॉडेल
एखाद्या शहराची माहिती असलेले अ‍ॅप अजूनपर्यंत तरी कोणी विकसित केलेले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे पर्यटन खाते आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे अ‍ॅप पर्यटन विभागाकडे सुपूर्द केले जाणार आहे. पर्यटन खाते राज्यभर या अ‍ॅपचा वापर करू शकेल. इतकेच काय देशभरातील पर्यटनाची माहिती एका क्लिकवर अ‍ॅपच्या माध्यमातून पर्यटकांना मिळणार आहे. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांनीही त्यात पुढाकार घेतला आहे.
नगर शहरात पर्यटनासारखी ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मात्र जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ती माहिती असतातच असं नाही. ही माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी अ‍ॅप विकसित केले आहे.
-अजय चारठाणकर, उपायुक्त.

Web Title: City tourism with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.