कामिका एकादशीनिमित्त नेवासा शहर बंद; प्रशासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 13:46 IST2020-07-15T13:46:02+5:302020-07-15T13:46:58+5:30
कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (१६ जुलै) नेवासा शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक-यांनी या कालावधीत नेवासा शहरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कामिका एकादशीनिमित्त नेवासा शहर बंद; प्रशासनाचा निर्णय
नेवासा : कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (१६ जुलै) नेवासा शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक-यांनी या कालावधीत नेवासा शहरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी संत ज्ञानेश्वर मंदिरात पैस खांबाच्या दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने बुधवारी सकाळी तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत नेवासा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते ही बंद असणार आहेत.
या बैठकीस प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख, गटविकास अधिकारी शेखर शेलार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, उपनगध्यक्ष नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, संजय सुखधान, संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे रामभाऊ जगताप, कैलास जाधव,ज्ञानेश्वर शिंदे हे उपस्थित होते.
कामिका एकादशीला होणारी संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा मंदिर संस्थानने या अगोदरच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.