पहिली ते सातवी वर्ग भरण्याबाबत नगरला आदेश नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST2021-08-12T04:24:48+5:302021-08-12T04:24:48+5:30

कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथिल असलेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ॲागस्टपासून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण ...

The city has no orders to fill classes I to VII | पहिली ते सातवी वर्ग भरण्याबाबत नगरला आदेश नाहीत

पहिली ते सातवी वर्ग भरण्याबाबत नगरला आदेश नाहीत

कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथिल असलेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ॲागस्टपासून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आठवी ते बारावीच्या शाळा १५ जुलैपासूनच सुरू झाल्या आहेत. शासनाने पंचवीस जिल्ह्यांत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्या जिल्ह्यात शाळा करण्याबाबतचे नियोजन आहे. मात्र, निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश नसल्याने शाळा सुरू होण्याबाबत साशंकता आहे. तसे कोणतेही आदेश शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला नाहीत.

-------------

जिल्ह्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा - ४,०७५

१७ ऑगस्टला सुरू किती होणार -०

------------

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?

पहिली - ६८,७१६

दुसरी - ७४,८९६

तिसरी - ७८,४५१

चौथी - ८०,४४९

पाचवी - ७९,६०५

सहावी - ७९,७१६

सातवी - ७९,७७८

समग्र

------------

आठवी ते बारावीला अल्प प्रतिसाद

आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - १,२३२

सुरू झालेल्या शाळा - १९४

एकूण विद्यार्थी - ६६,२००

विद्यार्थ्याची उपस्थिती (९ ऑगस्ट) - १६,३००

------------------

शासनाचा शाळा सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, अजूनही काही गावांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होईपर्यंत पहिली ते सातवी वर्ग सुरू करू नयेत.

- मंगल कोतकर, पालक

--------------------

शाळा सुरू होऊन शाळेत जाण्याची मुलांची इच्छा आहे. मात्र, कोरोनामुळे पालक पाल्यांना शाळेत पाठवण्यास इच्छूक नाहीत. वातावरण पूर्णपणे निवळल्यानंतर शाळा सुरू करावी.

- रोहिदास भाकरे, पालक

--------------

(डमी १०२०)

Web Title: The city has no orders to fill classes I to VII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.