शहर, परिसरात गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:11+5:302021-03-22T04:20:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे काही ...

City, hail in the area | शहर, परिसरात गारांचा पाऊस

शहर, परिसरात गारांचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे काही भागांतील विद्युतपुरवठा खंडित झाला होता.

शहर व परिसरात शनिवारी (दि. २०) सायंकाळीही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सावेडी उपनगरातील तपोवन रोड, लक्ष्मीनगर, निर्मलनगर, गुलमोहर रोड, भिस्तबाग चौक, सावेडी नाका, बोल्हेगाव, नागापूर, तारकपूर, दिल्ली गेट, नालेगाव, सारसनगर, केडगाव, आदी भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. रविवार असल्याने अनेकजण खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही भागांतील विद्युत पुरवठा बराच वेळ खंडित होता.

....

वातावरणातील बदलाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नगर शहरात रविवारी दिवसभरात २५० रुग्ण आढळून आले. त्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातारणातील गारवा वाढला आहे. कधी उष्णता तर कधी थंड वातावरण, यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. वातावरणातील बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: City, hail in the area