शहर व परिसरात खेळाची मैदाने विकसित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST2021-01-04T04:19:23+5:302021-01-04T04:19:23+5:30

येथील गंगा उद्यानशेजारील जागेत तयार करण्यात आलेल्या फुटबॉल मैदानाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते ...

The city and its environs will develop playgrounds | शहर व परिसरात खेळाची मैदाने विकसित करणार

शहर व परिसरात खेळाची मैदाने विकसित करणार

येथील गंगा उद्यानशेजारील जागेत तयार करण्यात आलेल्या फुटबॉल मैदानाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अमरजीतसिंह वाही, प्रशांत पठारे, सुहास करांडे, अभिजीत खोसे, वैभव वाघ, अक्षय बोराडे, किरण बारस्कर आदी उपस्थित होते. आमदार जगताप पुढे म्हणाले की, फुटबॉल हा जगात सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात टाळेबंदी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे मुश्कील होते. घरातूनच मोबाइलद्वारे अभ्यास सुरू असल्यामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष झाले होते. आता हळूहळू टाळेबंदी शिथिल होत असून, खेळ खेळणे शक्य होत आहे, असे जगताप म्हणाले. माजी नगरसेवक बोरकर म्हणाले की, गंगा उद्यानाशेजारील जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. मैदानाची जागा विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे बोरकर यांनी सांगितले.

...

सूचना फोटो: ०३ फुटबॉल नावाने आहे.

Web Title: The city and its environs will develop playgrounds