कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी नियम पाळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:47+5:302021-04-02T04:20:47+5:30
कोपरगाव : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरण्यासाठी दंडात्मक कारवाई बरोबर जनजागृती ...

कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी नियम पाळावे
कोपरगाव : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरण्यासाठी दंडात्मक कारवाई बरोबर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन नियमित मास्क वापरावे, असे आवाहन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाणे आणि सूर्यतेज संस्था, कोपरगाव यांचे वतीने सार्वजनिक खरेदी विक्री केंद्रावर मास्क वापरणे संदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. तशा आशयाचे जनजागृती भित्तीपत्रक तयार केले आहे.
जाधव म्हणाले, कोरोना नियंत्रण मोहिमेचा एक भाग म्हणून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मास्क न वापरणे तसेच कोरोना नियंत्रणासाठी शासनाचे नियम न पाळणारे यांचेवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. या सोबत जनजागृतीचे भित्तीपत्रक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आस्थापना, सार्वजनिक खरेदी विक्री केंद्रावर तसेच इतरही सार्वजनिक केंद्रावर चिकटवले जात आहे.
याप्रसंगी सूर्यतेज संस्थेचे अध्यक्ष सुशांत घोडके, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप काशिद, राजेंद्र म्हस्के, जयदीप गवारे, अंबादास वाघ, गोपनीय शाखेचे युवराज खुळे यांचेसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.