टबमध्ये बुडून बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 00:16 IST2016-04-06T00:10:11+5:302016-04-06T00:16:24+5:30
राहुरी : प्रसादनगर परिसरातील दीड वर्षाची बालिका विशाखा बोरूडे हिचा टबमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़

टबमध्ये बुडून बालिकेचा मृत्यू
राहुरी : प्रसादनगर परिसरातील दीड वर्षाची बालिका विशाखा बोरूडे हिचा टबमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़
राहुल बोरूडे यांची मुलगी विशाखा ही घरासमोर खेळत होती़ खेळत असतानाच ती पाण्याने भरलेल्या टबजवळ गेली़ टबमध्ये पडलेला साबण काढण्याच्या नादात विशाखाचा तोल गेला व ती पाण्यात पडली. नाकातोंडात पाणी गेल्याने विशाखा बेशुद्ध झाली. तिला त्वरित राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
(तालुका प्रतिनिधी)