लहान मुलांची तब्येत बिघडली, ओपीडीत तिप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:11+5:302021-08-21T04:25:11+5:30
अहमदनगर : कोरोनाचे संकट घोंगावत असतानाच सततच्या पावसामुळे लहान मुलांची तब्यत बिघडू लागली आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यू व निमोनियांचे ...

लहान मुलांची तब्येत बिघडली, ओपीडीत तिप्पट वाढ
अहमदनगर : कोरोनाचे संकट घोंगावत असतानाच सततच्या पावसामुळे लहान मुलांची तब्यत बिघडू लागली आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यू व निमोनियांचे रुग्ण आढळून येत असून, लहान मुलांचे आरोग्य संभाळावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
गेल्या आठवडाभरापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. त्याबरोबरच घराच्या आजूबाजूला साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. हा डास शक्यतो दिवसा चावतो. त्यामुळे डेंग्यूचा अजार होत असून, हे प्रमाण लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी डेंग्यूने डोकेवर काढले आहे. आधीच वातावरणात बदल झाला आहे. त्यात डास चावल्याने डेंग्यूचा अजार होत असून, ओपडीत तिपटने वाढ झाली आहे. लहान मुलांचे आरोग्य बिघडत असून, घराच्या आजूबाजूला पाण्यात साचलेले तळे काढून टाकावे. जेणेकरून डासांची पैदास होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
....
डेंग्यू, निमोनियाचे रुग्ण वाढले
पावसामुळे डासांची पैदास वाढली आहे. हा डास चावल्याने डेंग्यूचा आजार होत असून, हे प्रमाण लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहे. तसेच लहान मुलांमध्ये निमोनियाचे प्रमाण अधिक असून, त्यामुळे लहान मुले अजारी पडत असल्याचे सांगण्यात आले.
...
काय काळ घ्यावी?
- घराच्या आजूबाजूला साचलेले पाणी काढून टाकावे
- घरातील फ्लारपॉट रिकामे करावेत
- जुने भांडे, टायरमध्ये साचलेले पाणी काढून टाकावे.
....
पावसामुळे साचलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढलेली आहे. हा डास दिवसा चावतो. त्यामुळे डेंगू होतो. लहान मुलांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले असून, साचलेले पाणी काढून परिसर स्वच्छ ठेवावा.
- डॉ. सचिन वहाडणे, बालरोग तज्ज्ञ
............................
जिल्हा रुग्णालयात एकही रुग्ण नाही
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असे तज्ज्ञांचे मत होते. त्यामुळे येथील जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे. अद्याप एकही रुग्ण या कक्षात दाखल झालेला नाही.
- डॉ. वसंत जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचित्सक